Abhijit Karande
Abhijit Karande

@AbhijitKaran25

7 Tweets 1 reads Aug 31, 2023
राहुल गांधींचे गंभीर आरोप -
अदानी कंपनी नेटवर्कच्या माध्यमातून 1 बिलियन डॉलर वेगवेगळ्या देशात गेले आणि पुन्हा ते पैसे भारतात गुंतवण्यात आले. या पैशाच्या माध्यमातून अदानींच्याच कंपनीच्या शेअर्सच्या किंमती वाढवण्यात आल्या. #RahulGandhi #AdaniGroup
शेअर्सच्या किंमती वाढवून जो फायदा मिळाला तो भारतातील पोर्ट, विमानतळं आणि इतर गोष्टींच्या खरेदीसाठी वापरण्यात आला. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की हा पैसा कुणाचा आहे? अदानींचा आहे की इतर कुणाचा? आणि इतर कुणाचा असेल तर तो व्यक्ती कोण? #RahulGandhi #AdaniGroup
या सगळ्या व्यवहाराचे मास्टरमाईंड विनोद अदानी आहेत. जे गौतम अदानींचे भाऊ आहेत. त्याशिवाय आणखी दोन लोकांचा यात सहभाग आहे. त्यांची नावं नासर अली शबान अली, चांग चुंग लिंग या दोन लोकांनी या कामात मदत केल्याचं दिसतंय. #RahulGandhi #AdaniGroup
दुसरा प्रश्न असा आहे की अदानी हे सगळं करत असताना चायनिज व्यक्तीचा सहभाग कसा ? याचा काय रोल आहे? हे सगळं समोर आलं पाहिजे. आणि हे परदेशी लोक भारतीय शेअर मार्केटला कसं काय Manupulate करतात. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. या सगळ्यात चायनिज माणसाचा नेमका काय रोल आहे? #RahulGandhi
सेबीनं या प्रकरणाची चौकशी केली, मात्र ज्या व्यक्तीनं ही चौकशी केली आणि अदानी ग्रुपला क्लीन चीट दिली. तो व्यक्ती अदानींची कंपनी असलेल्या NDTV चा डायरेक्टर आहे. म्हणजे हे सगळं नेटवर्क आहे. #RahulGandhi #AdaniGroup
मग प्रश्न असा आहे की प्रधानमंत्री मोदीजी याबद्दल काहीच का करत नाहीत? शांत का आहेत? या फायनान्शिअल टाईम्स आणि द गार्डियन पेपर्सनी सरळ म्हटलंय की मोदी आणि अदानींचा संबंध आहे. मग ते नेमकं काय नातं आहे? #RahulGandhi #AdaniGroup
सीबीआय, ईडी अदानींची चौकशी का करत नाही? त्यांच्या व्यवहाराचं सगळा कच्चाचिठ्ठा का तपासत नाही? त्यामुळे जेपीसीच्या माध्यमातून अदानींची चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका पंतप्रधान मोदींनी घेतली पाहिजे. #RahulGandhi #AdaniGroup

Loading suggestions...