PaisaPani
PaisaPani

@PaisaPani

16 Tweets 3 reads Aug 23, 2023
रिलायन्स - यत्र, तत्र, सर्वत्र
रिलायन्सच्या साम्राज्याबाबत कोणालाच नव्याने सांगायला नको. गेल्या काही वर्षात या समूहाने अतिशय योजनाबद्ध पावले टाकत बऱ्याच क्षेत्रांमध्ये आपला व्यवसाय वाढवला आहे.#म #मराठी #Reliance
काही वर्षांपूर्वी रिलायन्सने जिओ लाँच करून टेलिकॉम क्षेत्रामध्ये क्रांती घडवली होती. भारतातील पहिल्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी बनण्यासाठी जिओला फार काळ लागला नाही. रिलायन्स जिओ बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यावर आता मुकेश अंबानी #म #मराठी #Reliance
जिओ सिनेमाद्वारे ओटीटी जगतावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या मार्गावर आहेत.याशिवाय फायनान्स, सॉफ्टड्रिंक्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये रिलायन्स प्रस्थापितांना जोरदार टक्कर देत आहे.  कोणत्या क्षेत्रात रिलायन्स नक्की कोणाला स्पर्धा देत आहे यावर प्रकाश टाकणारा हा थ्रेड #म #Reliance
रिलायन्सने आपला स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा लॉन्च केला.सुरुवातीला फारसा प्रतिसाद न लाभलेल्या जिओ सिनेमाने आयपीएलचे मोफत प्रसारण करून थेट या क्षेत्रातील दादा समजल्या जाणाऱ्या हॉटस्टारला जवळपास स्पर्धेतून बाद केले आहे.आता तर जिओ सिनेमा हॉटस्टारला विकत घेणार अशीही वदंता आहे.
रिलायन्सने नुकतेच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या आपल्या कंपनीचे रिलायन्स इंडस्ट्रीजमधून डीमर्जर केले. लिस्टिंग होण्याआधीपासूनच ह्या स्टॉक बद्दल लोक बुलिश होते. आता जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस बजाज फायनान्सला टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. #म #मराठी #Reliance
सॉफ्टड्रिंक क्षेत्रामध्ये देखील रिलायन्स मागे नाही. या क्षेत्रात यायचे तर आपल्याला स्वतःचा ब्रँड हवा हे रिलायन्सच्या लक्षात आले. त्यांनी काही वर्षांपूर्वी बंद पडलेला कॅम्पाकोला हा ब्रँड पुनरुज्जीवीत केला. #म #मराठी #Reliance
या ब्रॅण्डद्वारे रिलायन्स थेट कोकाकोला आणि पेप्सिकोला शिंगावर घेत आहे. कॉस्मेटिक्स, ब्युटी प्रॉडक्ट क्षेत्रातही रिलायन्सचा ब्रँड तिरा हा नायकाला टक्कर देतोय. दुसरीकडे अजीओ हा रिलायन्स प्लॅटफॉर्म मिंत्रासारख्या प्रस्थापितांना क्लोदिंग क्षेत्रामध्ये कडवी स्पर्धा उभी करतो आहे. #म
ऑनलाईन फार्मसी क्षेत्रामध्ये रिलायन्सने फार्मईझी या ब्रँडविरोधात आपला नेटमेड्स हा ब्रँड उतरवला आहे. ऑनलाईन म्युझिक स्ट्रिमिंग क्षेत्रामध्ये रिलायन्सने स्पॉटीफायच्या विरोधात आपला जिओ सावन हा ब्रँड उतरवला आहे. #म #मराठी #Reliance
ज्वेलरी क्षेत्रामध्ये रिलायन्सने टाटांच्या तनिष्क ब्रँडला टक्कर देण्यासाठी आपला रिलायन्स ज्यूवेल्स नावाचा व्यवसाय सुरू केला आहे तर एफएमसीजी क्षेत्रामध्ये रिलायन्स रिटेल ही कंपनी डी मार्ट सारख्या कंपन्यांना पुरून उरते आहे. #म #मराठी #Reliance
इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या बाबतीत टाटांच्या क्रोमा या चेनला रिलायन्सकडून रिलायन्स डिजीटलद्वारे उत्तर दिले आहे. इंधन क्षेत्रामध्ये इंडियन ऑइल, बीपीसीएल सारख्या सरकारी कंपन्यांना जिओ-बीपी ही कंपनी लवकरच चांगली स्पर्धा देऊ शकते. #म #मराठी #Reliance
ऑनलाइन ग्रोसरी क्षेत्रात रिलायन्सची जिओ मार्ट विरुद्ध बिग बास्केट असे युद्ध रंगले आहे तर मीडिया क्षेत्रामध्ये रिलायन्सचा नेटवर्क १८ विरुद्ध झी आणि सोनी अशी टक्कर आहे. #म #मराठी #Reliance
रिलायन्सच्या या सगळ्या वाटचालीबद्दल नीट विचार केला तर एक लक्षात येईल की रिलायन्स तुमच्या आमच्याशी निगडित असलेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करून वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. #म #मराठी #Reliance
इंटरनेटवर याबाबत एक सुंदर उदाहरण वाचण्यात आले. तुम्हाला लागणारा किराणा माल तुम्ही जिओमार्टमध्ये विकत घ्याल, गाणी ऐकायची असतील तर ती जिओ सावनवर ऐकू शकाल, कपडे घ्यायचे तर ते अजिओवरून ऑर्डर करू शकाल, #म #मराठी #Reliance
आणखी काही सामान घ्यायचे असेल ते रिलायन्स रिटेलमधून तुम्ही घेऊ शकता. सकाळी नाश्ता करताना तुम्हाला बातम्या बघायच्या असतील तर नेटवर्क१८ च्या एखाद्या न्यूज चॅनेलवर तुम्ही त्या पाहू शकता. कामावर जाताना गाडीत पेट्रोल-डिझेल भरायचे असेल #म #मराठी #Reliance
तर जिओ-बीपीच्या पंपावर थांबून तुम्ही ते भरून घेऊ शकता. दिवसभर रिलायन्सनेच अक्वायर केलेल्या एखाद्या कंपनीमध्ये काम करून घरी आलात की संध्याकाळी कॅम्पाकोला पित जिओ सिनेमावर तुम्ही आयपीएलदेखील पाहू शकता. #म #मराठी #Reliance
आजारी पडलात तर नेटमेड्स या फार्मसीमधून मागवलेली औषधे घेऊन झोपी जाऊ शकता आणि एक दिवस आपणही अंबानी बनवून असे स्वप्नदेखील पाहू शकता.
थ्रेड आवडला असेल तर रिट्विट नक्की करा..
#म #मराठी #Reliance

Loading suggestions...