Kalpesh | कल्पेश
Kalpesh | कल्पेश

@Atarangi_Kp

7 Tweets 43 reads Aug 10, 2023
एवढी वर्ष नोकरी करताय मग तुमचा PF वेळोवेळी चेक करताय ना ?
तुमचा भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PF हि तुमची नोकरी करताना केलेली भविष्यासाठीची तरतूद आहे आणि त्या बद्दल वेळोवेळी माहिती घेणे, शिल्लक म्हणजेच बॅलन्स चेक करणे देखील खूप महत्वाचे आहे, आज या बद्दल जाणून घेऊ
🧵१/७
#मराठी #म
PF बॅलन्स चेक करण्याचे ४ मार्ग आहेत.
त्यातील सर्वात जलद मार्ग म्हणजे 9966044425 या नंबर वर मिस्ड कॉल देऊन तात्काळ PF बॅलन्स तुमच्या मोबाईल वर SMS द्वारे मिळविणे, मिस्ड कॉल देताच १-२ मिनिटांत तुम्हाला मेसेज येतो. त्यामध्ये तुमची शेवटची जमा झालेली रक्कम आणि बॅलन्स आणि
२/७
तुमच्या UAN नंबर ची माहिती दिलेली असते, फक्त मोबाईल नंबर PF अकाउंट ला लिंक हवा, मग लगेच वापरून बघा.
दुसरा मार्ग जर तुमचा PF अकाउंट रजिस्टर मोबाईल नंबर सोबत नसेल तर तुम्ही वापरू शकता,पण त्यासाठी तुम्हाला तुमचा UAN नंबर माहिती हवा तुम्ही कोणत्याही नंबर वरून EPFOHO UAN असा SMS
#३/७
7738299899 या नंबर वर पाठवू शकता तुम्हाला PF बॅलन्स ची माहिती मोबाईल वर मिळेल
आता तिसरा मार्ग थोडा लांबचा आहे पण तुम्हाला इथे फक्त बॅलन्स नाही तर पूर्ण PF पासबुक मिळेल, PF चे पैसे कधी जमा झाले, एम्पलॉयर चे काँट्रीब्युशन किती होत, तुमच्या पगारातून किती कापले याबद्दल तारखेसकट
#४/७
पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल त्यासाठी तुम्हाला जावं लागेल EPFO च्या संकेतस्थळावर.
इथे आल्यावर Services मध्ये For Employees वर क्लिक करा नंतर Member passbook वर क्लिक करा मग UAN आणि पासवर्ड ने लॉगिन करा जर तुम्ही अगोदर ID बनवला नसेल तर 'मेंबर्स' मध्ये जाऊन रजिस्टर करा.
#५/७
चौथा पर्याय आहे मोबाईल अप्लिकेशन "उमंग" (UMANG)
हे PF चे अधिकृत अँप्लिकेशन आहे यावर लॉगिन करून EPFO मध्ये जा तिथे UAN आणि OTP टाकून लॉगिन करा मग तुम्ही पासबुक, क्लेम, क्लेम ट्रॅकिंग, UAN ऍक्टिव्हेट करण, UAN कार्ड डाउनलोड करण सर्व काही एका क्लिक मध्ये करू शकता.
#६/७
याच अँप्लिकेशन वर तुम्ही डिजिलॉकर सहित अनेक सुविधा देखील आहेत.
नक्कीच चेक करा.
#मराठी #म #माहिती #Marathi #PF #savings
#७/७

Loading suggestions...