Devashish Kulkarni
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

14 Tweets 19 reads Apr 01, 2022
#Thread: धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, औरंगजेब आणि इस्लाम
मरणाला त्या मारुनी तुम्ही, मोक्षाला गेला येथे।
ज्वज्ज्वलनतेजस तुम्ही राजे, गौरविला गेला येथे॥
आज मृत्यूंजय अमावस्या - धर्मवीर शंभुछत्रपतींची पुण्यतिथी.
सर्वप्रथम या स्वधर्माभिमानी महापुरुषास त्रिवार वंदन💐🙏🏼
१/१४
१६८० साली पुण्यश्लोक शिवछत्रपतींच्या कैलासवासानंतर स्वराज्याची जबाबदारी संभाजीराजेंनी “राजेश्री आबासाहेबांचें जें संकल्पित तेंच करणें आम्हांस अगत्य” असं म्हणत उत्तमरित्या सांभाळली.
मोगल, सिद्दी, फिरंगी (पोर्तुगीज), टोपीकर इंग्रज - या सर्व शत्रुंशी संभाजीराजे लढत होते.
२/१४
मराठे मोगलांवर भारी पडत होते. म्हणून दस्तुरखुद्द दिल्लीपती औरंगजेब मराठ्यांना संपवण्याच्या हेतूने स्वराज्यावर चालून आला.
दिल्ली सोडून २५ वर्षे त्याने महाराष्ट्रात घालवली. पण मराठ्यांना संपवणे हे त्याच्या सामर्थ्यापलिकडचे होते.
३/१४
फेब्रुवारी १६८९ च्या सुरुवातीला शंभुछत्रपती रायगडास जाण्यासाठी निघाले होते.
३ फेब्रुवारी, १६८९ रोजी संगमेश्वरास असताना औरंगजेबाचा सरदार शेख निजाम हैदराबादी (मुकर्रबखान) याने संभाजीराजे आणि कबजी कलशास कैद केले.
४/१४
१५ फेब्रुवारी, १६८९ रोजी छत्रपती संभाजी महाराज आणि कबजी कलशाला बहादूरगड येथे औरंगजेबाच्या दरबारात आणले गेले.
मराठ्यांविषयी प्रचंड द्वेष असणाऱ्या औरंगजेबाला बेड्यांमध्ये असलेल्या शंभुछत्रपतींना बघून किती आनंद झाला हे मआसिर-ए-आलमगिरी मध्ये साफ नमूद केलेलं आहे.
५/१४
मआसिर-ए-आलमगिरी हा ग्रंथ औरंगजेबाचा लाडका शिष्य आणि शेवटचा सचिव असणाऱ्या इनायतुल्लाह खान कश्मिरी च्या सांगण्यावरुन साकी मुस्तैद खैन याने १७१० साली पूर्ण केला.
इस्लाम च्या शिकवणीप्रमाणे वागणाऱ्या औरंगजेबाने शंभुछत्रपतींचा दरबारात कसा अपमान केला हे पण खाली साफ नमूद आहे.
६/१४
छत्रपती संभाजीराजे यांनी कधीही मोगल दरबाराचा मान राखला नसल्यामुळे आणि ते १६६६ साली शिवछत्रपतींसोबत आग्र्याहून निसटून गेल्यामुळे संभाजीराजे यांची दृष्टी हडपण्यात आली.
तसेच कबजी कलशाचा जीभ कापून टाकण्यात आली.
७/१४
१५ फेब्रुवारी ते ११ मार्च (१६८९) - या कालावधीत छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांच्यावर औरंगजेबाच्या सांगण्यावरुन आतोनात अत्याचार करण्यात आले.
आणि हे सगळं औरंगजेब त्याच्या धर्मात सांगितल्या गेल्याप्रमाणे करत होता - हे त्रिवार सत्य अनेक समकालीन साधनांमध्ये नमूद केलेलं आहे.
८/१४
छत्रपती संभाजीराजे यांनी म्लेंच्छांचा संहार केला, इस्लाम ची शहरे लुटली व म्लेंच्छांची प्रार्थनास्थळे उध्वस्त केली म्हणून शरियावर आधारित फतव्याप्रमाणे व इस्लामी कायद्याचे जाणकार असलेल्या मौलवींच्या सांगण्यावरुन औरंगजेबाने ११ मार्च, १६८९ रोजी शंभुछत्रपतींची हत्या केली.
९/१४
इश्वारदास नागर च्या फुतूहात-ए-आलमगिरी मध्ये देखील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना कैद करुन त्यांच्यावर कशा प्रकारचे अत्याचार केले गेले व त्यांना शाही फरमान काढून मारण्यात आले हे साफ नमूद केले आहे.
संदर्भः Ishwardas Nagar’s Futuhat-i-Alamgiri, translated by Tasneem Ahmad
१०/१४
भीमसेन सक्सेनाच्या तारीख-ए-दिलकशा मध्ये देखील धर्मांध औरंगजेबाच्या नीचपणाचा दाखला सोप्प्या शब्दात दिलेला आहे.
संदर्भः Tarikh-I-Dilkasha (Editor: V.G.Khobrekar)
११/१४
वरील सर्व परकीय समकालीन साधनांतून हे साफ कळून येतं की छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करुन त्यांची हत्या मोगल बादशाह औरंगजेब याने इस्लाम/शरिया/मौलवी यांच्या सांगण्यावरुन केली होती.
धर्मवीरांनी काही जे सहन केलं ते आपल्या कल्पनेच्या ही पलिकडचे आहे.
१२/१४
ह्या आहुतीने हिंदवी स्वराज्याचा यज्ञ शांत नाही झाला. उलट संभाजीराजेंच्या बलिदानाने तो अजून तेजस्वी झाला.
जे काही मतभेद होते ते बाजूला टेवून मराठे लढले आणि आलमगिर औरंगजेब शेवटी हतबल अवस्थेत महाराष्ट्राच्या भूमितंच मृत्यू पावला.
१३/१४
या धर्मांध औरंगजेबास पदोपदी धूळ चारणारे शिवछत्रपती आणि या धर्मयुद्धात स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या धर्मवीर शंभुछत्रपती यांच्या पुण्य व प्रतापी स्मृतिस त्रिवार वंदन🙏🏼
संदर्भः
१) मआसिर-ए-आलमगिरी (मराठी अनुवाद - रोहित सहस्रबुद्धे
२) MAĀSIR-I-ĀLAMGIRI (Jadunath Sarkar)
१४/१४

Loading suggestions...