KhadakSingh🚩
KhadakSingh🚩

@khadaksingh_

9 تغريدة 23 قراءة Mar 22, 2022
#ED ने मुख्यमंत्री ठाकरे ह्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर ह्यांची ६.४५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे 🔥🔥
नेमक प्रकरण काय आहे त्यावर हा शॉर्ट #थ्रेड
८ नोव्हेंबर २०१६ साली मोदींजीनी नोटबंदी केली आणि ५०० ,१००० च्या जुन्या नोटा रद्द केल्या !!
ह्या मुळे काळा पैसा कॅश मधे जमा केलेल्या लोकांचे हाल झाले ! मुंबईतले नेते ( धनुष्य बाण वाले) तर धाय मोकलून रडायचे बाकी होते !
पण तेव्हा त्यांच्या मदतीला आले हवाला नेटवर्क चालवणारे पटेल!
मोदीजीनी जुन्या नोटा जमा करायला ४० दिवस दिले होते ! परंतु बँकेत ह्या नोटा जमा करताना सगळे डॉक्युमेंट्स द्यावे लागत होते ! ह्यावर पळवाट म्हणून हवाला ऑपरेटरनी खोट्या शेल कंपन्या उघडण्याचा धडाका लावला !
अश्यातच धनुष्य बाणवाल्या नेत्यांनी चंद्रकांत पटेल जे हवाला ची कामे करतात त्यांना पकडले व त्यांना त्यांच्या जवळील ८४ कोटींची कॅश दिली !
पटेलांनी खोट्या ५ कंपन्या बनवल्या आणि त्यात ही कॅश ट्रान्स्फर केली !! आणि ह्या कंपन्यांनी ही रक्कम "पुष्पक सराफ" कंपनीत डिजिटल ट्रान्स्फर केली
आता ही पुष्पक सराफ कंपनी पटेल ह्यांच्याच अधिकृत मालकीची आहे !!
ह्या कंपनीने युनियन बँक ऑफ इंडिया कडून २५८ कीलोंचे सोने विकत घेतले !
आता हे सर्व नोटबंदीच्या ४० दिवसात झाले बर !!
जेव्हा मार्केट मध्ये नवीन नोटा उपलब्ध झाल्या तेव्हा हेच सोन विकून त्याचे कॅश मधे रूपांतर करण्यात आले आणि त्यातून अनेक मालमत्ता घेण्यात आल्या !!
सप्टेंबर २०१७ ला #ED ला ह्या प्रकरणाचा सुगावा लागला आणि त्यांनी पटेल ह्यांना अटक केली !! आता
ह्या प्रकरणात बाण वाले नेते आहेत हा आरोप काँग्रेस चे नेते "संजय निरुपम" ह्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता !!
इतकेच नाही जे मनसेचे ६ नगरसेवक २०१७ ला शिवसेनेने फोडले होते त्यांना प्रत्येकी ५ कोटी कॅश देखील पटेल ह्यांनीच हवाला मार्गे दिली असा आरोप देखील झाला !!
आता ह्या काळया पैशाचा #ED छडा लावत असून ह्या आधीच २२ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे !! आणि आज ६.५ कोटींची मालमत्ता जी श्रीधर पाटणकर ह्यांच्या नावावर आहे ती जप्त करण्यात आली आहे !!
पण खरी गंम्मत पाटणकरांच्या हातातून हा पैसा पुढे कुठे गेला ते समोर आल्यावर येणार आहे !
आणि तेव्हा मेहुणे ,मेहुणे , मेहूण्यांचे पावणे देखील तोंड लपवत फिरतील ह्यात शंका नाही 😇

جاري تحميل الاقتراحات...