समीर कुलकर्णी
समीर कुलकर्णी

@paramvaibhav

12 Tweets 78 reads Aug 23, 2021
#Thread
राष्ट्रीय स्वयंसेवक संघा मध्ये वर्षभरात ६ उत्सव साजरे केले जातात.
१. #वर्षप्रतीपदा - गुढीपाडवा , हिंदू नववर्ष दिन , आद्य सरसंघचालक पूजनीय डॉ. हेडगेवार जन्मतिथी.
२. #हिंदू_सम्राज्य_दिवस - छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस
३. #गुरू_पौर्णिमा - व्यास पौर्णिमा +
भगव्या ध्वजाला गुरू मानून त्या समोर तन, मन व धन ह्यांचे समर्पण करणे. धनाचे समर्पण म्हणजे वर्षभर स्वयंसेवकांनी साठवलेली #गंगाजळी भगव्या ध्वजाला म्हणजे आपल्या गुरूला अर्पण करणे. ह्यात समर्पण किती केले हा विषय नसून जे काही माझे असेल ते मी स्वेच्छेने गुरूला समर्पित करणे हा भाव असतो +
४. #रक्षा_बंधन - राखी पौर्णिमा , ह्या दिवशी स्वयंसेवकांद्वारे निरनिराळे उपक्रम राबवून , सामाजिक रक्षाबंधन केले जाते. समाजातील भेदभाव मिटवून समानता आणि समरसता ह्याचे स्वरूप कसे असावे हे स्वयंसेवक दर्शवून देतात.
५. #विजयादशमी - राष्ट्रीय स्वयंसेवक स्थापना दिवस. ह्या दिवशी +
समाजातील अत्याचारांवर , समाजातील दुर्जन शक्तींवर संघाच्या सज्जन शक्तीने विजय मिळविण्यासाठी शक्ती प्रदर्शन अर्थात शिस्तबद्ध संचालन केले जाते. ह्याच दिवशी शस्त्रपूजन सुद्धा होते. हे संचलन शहरातील , उपनगरातील काही ठराविक मार्गांवरून नेले जाते जेणेकरून त्या त्या भागातील समाजाला +
त्याचे दर्शन घेता यावे. संचलनात वाजत असलेला घोष आणि त्यावर वाजवीत असलेल्या श्रुती अतिशय श्रवणीय असतात.
६. #मकर_संक्रांत - ह्या दिवशी तिथि नुसार, सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण चालू होते. ह्या संक्रमणाचा समाजात सकारात्मकता येण्या साठी संघात वेगवेगळे स्वयंसेवक +
आपापल्या घरून धान्य आणून , एकाच ठिकाणी एकत्र मिळून खिचडी पण बनवतात आणि सर्व मिळून एकत्र जेवतात जेणेकरून सर्वांमध्ये एकतेचा भाव निर्माण होईल.
प्रत्येक सण एका विशिष्ट गुणवत्तेला सूचित करतो. जसे गुरुपौर्णिमा, स्वयं-विनंती आणि समर्पण, रक्षाबंधन द्वारे सौहार्द आणि समतेचे प्रकटीकरण +
विजयादशमी, वर्षा प्रतिपदा आणि हिंदू साम्राज्यदिवस, प्रयत्नांचे प्रबोधन, राष्ट्रवाद आणि आत्म अभिमान, पराभूत मानसिकतेत बदल आणि मकर संक्रांतीद्वारे योग्य दिशा मध्ये योग्य क्रांती आणि संघटनेची भावना निर्माण करणे उत्सवांच्या माध्यमातून स्वकेंद्रित स्वभाव बदलून सामाजिक भान +
जागृत करणे.
कालच रक्षाबंधन साजरे झाले. ह्या उत्सवाबद्दल बोलायचे झाले तर , संघ दृष्टीने , रक्षाबंधन हे कायमच संघ स्वयंसेवकांचे समाजाप्रती असलेल्या कर्तव्याशी निगडित असते. म्हणून संघामध्ये ह्या दिवशी सकाळी किंवा ह्या दिवसापासून काही ठराविक दिवस रक्षाबंधन उत्सव हा +
#सामाजिक_रक्षाबंधन म्हणून साजरा केला जातो. म्हणून दर वर्षी स्वयंसेवक समाजातील भेडसावणाऱ्या प्रश्नांना उत्तरे शोधत रक्षाबंधन करत असतात.
मागील काही वर्षात कधी वृक्षारोपण तर कधी , e-waste , plastic कचरा ह्यावर जनजागृती करत हा कचरा गोळा करून तो व्यवस्थित ठिकाणी पोहोचवणे +
रद्दी संकलन करून त्याच्या पिशव्या बनवून निरनिराळ्या दुकानात किंवा घरोघरी देणे.
गेली दोन वर्षे corona मुळे प्रत्यक्ष रक्षाबंधन घेता नाही आले, परंतु ह्या वर्षी corona योद्ध्यांना गौरव पत्र देऊन आणि राखी बांधून सामाजिक रक्षाबंधन करायचे ठरवले आहे.
आजही समाजामध्ये संघ स्वयंसेवक +
नसलेले नागरिक सुद्धा , सामाजिक रक्षाबंधन करताना दिसतात. ह्याचाच अर्थ समाजामध्ये सकारात्मक बदल होत असून तो समाजाच्या शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचला पाहिजे हेच तर संघाचे उद्दिष्ठ आहे आणि त्यासाठी स्वयंसेवक दिवस रात्र कष्ट घेत आहेत...
ज्यांना कोणाला संघाबद्दल , दैनंदिन शाखेबद्दल +
माहिती हवी असल्यास , संघ समजून घ्यायचा असल्यास खालील लिंक वर स्वतःची माहिती भरावी.
rss.org
तुमच्या भागातील आमचे संघ स्वयंसेवक तुम्हाला नक्की संपर्क करतील. 🙏
@RSSorg
#RSS

Loading suggestions...