Devashish Kulkarni
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

18 Tweets 15 reads Aug 08, 2021
#Thread : गोंद्या आला रे!
ZEE5 वर @malhar_pandey ने सुचवलेली #GondyaAlaRe ही मालिका बघितली.
मालिका बघून झाल्यावर मनामध्ये अभिमान आणि राग या दोन्ही भावना प्रकट झाल्या.
सर्वप्रथम, क्रांतिवीर चापेकर बंघू आणि महादेव रानडे यांच्या वीरस्मृतीस त्रिवार वंदन🙏🏼
१/१७
दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर, वासुदेव हरी चापेकर आणि महादेव रानडे यांनी इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतिची जी ज्योत प्रज्वलित केली ती अनेक क्रांतिकारकांनी पुढे तशीच प्रज्वलित ठेवली ह्याचा सार्थ अभिमान वाटतो.
२/१७
१८९७ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. असंख्य लोकांनी या भयानक रोगामुळे आपले प्राण गमवले होते.
इंग्रज सरकारने या प्लेगला नियंत्रित करण्यासाठी वॅाल्टर चार्ल्स रॅंड च्या अध्यक्षेतेखाली एक कमिटी स्थापन केली होती.
पुण्यातील जनतेचा त्रास कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या...
३/१७
...ह्या कमिटीने मात्र लोकांवर अत्याचार करायला सुरु केलं.
रॅंड ने उचललेल्या पाऊलांनी सामान्य जनता त्रस्त झाली होती.
इंग्रज आणि त्यांचे गुलाम तपासाच्या आड ऊट-सुट लोकांच्या घरी घुसून त्यांच्यावर अत्याचार करायला लागले.
स्त्रीयांवर बलात्कार, सामानाची नास-धूस, देवी-देवतांचे...
४/१७
...विटंबन पुण्यात सर्रास सुरु होतं.
लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रमाणे चापेकर बंधूंसाठी ही शिवछत्रपती हेच प्रेरणास्थान होते.
महाराजांची स्वराज्याची कल्पना आत्मसात करणे हेच त्यांचे ध्येय होते.
रॅंड आणि त्याच्या गुलामांनी चालू ठेवलेल्या अत्याचारांना...
५/१७
...थांबवण्यासाठी चापेकर बंधूंनी सशस्त्र क्रांतिचा मार्ग निवडला.
२२ जून, १८९७ रोजी राणी विक्टोरियाचा हीरकमहोत्सव होता.
याच दिवशी दामोदर आणि बाळकृष्ण चापेकर यांनी वॅाल्टर चार्ल्स रॅंड आणि ले.आयर्स्ट यांचा वध केला.
गणेशखिंडीत गणपती पावला!
६/१७
रॅंडच्या वधात सामिल असणाऱ्यांना लवकर पकडणं इंग्रजांसाठी गरजेचं होतं.
काही वर्षांपूर्वी, आद्य क्रांतिकारक असणाऱ्या वासुदेव बळवंत फडके या ब्राह्मणाने रामोशी, धनगर, भिल, महार, मांग आदि समाजाच्या लोकांना एकत्र आणून इंग्रजांविरुद्ध बंड पुकारला होता, हे इंग्रज विसरले नव्हते.
७/१७
म्हणून रॅंडच्या वधानंतर इंग्रजांनी आणि त्यांच्या गुलामांनी पुण्यातल्या ब्राह्मण तरुणांना अटक करायला सुरुवात केली.
या वधात लोकमान्य टिळकांना आडकवायचं इंग्रजांच्या मनात होतं.
शेवटी काही ‘आपल्याच’ लोकांच्या गद्दारीमुळे दामोदर आणि बाळकृष्ण चापेकर पकडले गेले.
८/१७
ह्याच गद्दारांना यमसदनी पाठवल्यामुळे वासुदेव चापेकर आणि महादेव रानडे ह्यांना अटक झाली.
दामोदर (वय: २९ वर्ष) यांना १८/०४/१८९८, बाळकृष्ण (वय: २६ वर्ष) यांना १२/०५/१८९९, वायुदेव (वय: २० वर्ष) यांना ०८/०५/१८९९ आणि महादेव यांना १०/०५/१८९९ रोजी फाशी दिली गेली.
९/१७
हे चौघे इंग्रजांची चाकरी करुन आरामाचं आयुष्य घालवू शकले असते. पण मातृभूमिसाठी, स्वराज्यासाठी संसाराचा त्याग करुन त्यांनी हा खडतर मार्ग निवडला.
ह्या चोघांनाही फाशीची शिक्षा झाली.
३० वर्षाच्या आतले तरुण हुतात्मा झाले.
१०/१७
चापेकर बंधू आणि महादेव रानडे हे तर अमर झाले पण त्यांच्या परिवाराचे काय झाले? या बद्दल कधीच कोणाला बोलताना ऐकलं नाही.
चापेकर बंधूंच्या बलिदानानंतर त्यांच्या वयस्कर वडीलांवर, बायकांवर आणि लहान मुलांनवर काय वेळ आली असेल ह्याची कल्पना पण करवत नाही.
११/१७
ज्या वेळी काही लोकं इंग्रजांची गुलामी पतकरून जनतेचं धर्मांतरण करवून घेत होती त्या वेळी अनेक तरुणांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सशस्त्र क्रांति करुन या इंग्रज सरकारच्या नाकी नऊ आणले होते.
अशा ह्या सगळ्या महान क्रांतिकारकांचं रृण आहे आपल्यावर - हे विसरुन चालणार नाही.
१२/१७
काही दिवसांपूर्वी, एक विषारी माणसाचा एक विषाक्त लेख वाचला होता. त्याला रॅंड चा मृत्यू जरा जास्तंच जिव्हारी लागला होता.
फक्त धर्मावर आणि ‘ब्राह्मणांवर’ अत्याचार होत होते म्हणून चापेकर बंधूंनी रॅंड ची ‘हत्या’ केली असं त्याचं म्हणणं होतं.
१३/१७
पुण्यात काय ‘फक्त’ ब्राह्मण राहात होते का?
प्लेग काय ‘फक्त’ ब्राह्मणांना होत होता काय?
बलात्कार काय ‘फक्त’ ब्राह्मण स्त्रीयांवर होत होते काय?
इंग्रज ‘फक्त’ ब्राह्मणांवर अत्याचार करत होते काय?
असो, विषारी मानसिकतेच्या लोकांना हे प्रश्न ही पडत नसतील.
१४/१७
फक्त ब्राह्मद्वेषाच्या नावाखाली ही लोकं चापेकर बंधूंचं हौतात्म्य खोडायला निघाली आहेत.
त्या वेळी पण अनेक ब्रह्मद्वेष्टी मंडळी इंग्रजांच्या गुलामगिरीत होतीच.
मातृभूमिसाठी काही करणं तर दूरंच पण जे करत होते त्यांच्या कामात अढतळा आणण्याचे काम ही मंडळी करत होती.
१५/१७
विविध जातींमध्ये तेढ निर्माण करणारे खूप होते. अजूनही आहेत.
पण रामोशी, धनगर, भिल, महार, मांग आदि समाजाच्या लोकांना एकत्र आणून इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे लोक देखील होते.
आणि आपल्याला अशाच लोकांचा अभिमान असला पाहिजे.
१६/१७
कोणी किती ही प्रयत्न केला तर ‘जातीच्या आधारावर’ त्यांना क्रांतिकारकांचे हौतात्म्य हिरावून घेता येणार नाही. त्यांनी हे केविलवाणे प्रयत्न चालू ठेवावेत.
या भारतभूमिच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक महापुरुषास त्रिवार वंदन💐🙏🏼
१७/१७
Unroll @rattibha

Loading suggestions...